बदनापूर येथे पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टो यांच्या विरोधात केलेल्या निषेध आंदोलनात लहान मुलाचे शोषण केल्याबद्दल आ. नारायण कुचे व इतर सहकार्यांवर चाईल्ड प्रोटेक्शन अक्टनुसार कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या सचिवांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भाजपच्या वतीने बिलावल भुट्टो विरोधात निषेध आंदोलनात भाजपा कार्यकर्त्यांनी एका चार ते पाच वर्षाच्या मुलाचे लिंग ओढून त्याला लघुशंका करण्यास दबाव आणला. असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या लहान मुलावर दडपण आणण्याचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी आंदोलनकर्ते आमदार नारायण कुचे व इतर सहकार्यांवर चाईल्ड प्रोटेक्शन ऑक्टच्या कायद्यान्व कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टो यांनी जे वक्तव्य केले त्याचा आम्ही निषेध करतो. मात्र, भाजपच्या पदाधिकार्यांनी जे कृत्य केले ते अतिशय घृणास्पद असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असे जिल्हा कॉग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल रफिक यांनी म्हटले आहे. यावेळी अब्दुल रफिक, जावेद खान पठाण, अब्दुल फैज, अब्दुल मंजूर अ.गफार, अख्तर बागवान, हैदर खान, तय्यब बापूसह ई. पदाधिकार्यांची उपस्थिती होती.