जालना जिल्ह्यात रोजच नव वनीन गुन्हे पेढे येत आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने जालना जिल्हा नेहमीच चर्चेत राहीला आहे. अशीच एक जोरदार चर्चा तालुका पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्याने केलेल्या प्रतापामुळे सुरु झाली आहे. तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल रखवालदारानेच चोरल्याची तक्रार करण्यात आलीय. विशेष म्हणजे या प्रकरणाची पुर्ण चौकशी झाल्यानंतर हा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीय निरीक्षक रमेश जायभाये यांनी फिर्याद दिली असून त्यात त्यांनी गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आठ लाखाहुन अधिकचा मुद्देमाल गायब असल्याचे म्हटले आहे. जालना तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन मोहरील पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. बी. चव्हाण हे मोहरील म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची नेमणूक अंबड येथे झाली. दिनांक 22 जुलै 2015 ते 26 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पोलीसांनी विविध गुन्हा मध्ये जप्त केलेला मुद्देमाल हा एस. बी. चव्हाण यांच्या निगराणीखाली पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेला होता. यात 40 गुन्ह्यामध्ये जप्त केलेला सोन्या चांदीचा मुद्देमाल पोलीस हेड कॉन्स्टेबल एस. बी. चव्हाण यांनी निष्काळजीपणाने हलगर्जी करून आणि भ्रष्ट स्वरूपाचे वर्तन करून लंपास केला. या प्रकरणी महानगरी सेवा वर्तणूक नियम 1979 चे कलम 3 चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भादंवि च्या कलम 420 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हेडकॉन्स्टेबल एस बी चव्हाण यांची जालना तालुका पोलीस ठाण्यातून अंबड येथे बदली झाली. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या मोहरील पदाचा पदभार इतर कर्मचार्यांकडे सोपवण्याचे सुचवले, त्यासाठीची प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले गेले. मात्र मुद्देमाल तपासून हा पदभार देण्यासाठी एस. बी. चव्हाण येत नव्हते, अखेर पंचा समक्ष चोरीमध्ये जप्त केलेल्या मुद्देमालाची तपासणी केली आणि त्यामध्ये 40 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला आठ लाख चार हजार 894 रुपयांचा मुद्देमाल हा पावती प्रमाणे आणि (प्रत्यक्षात आठ लाख 51 हजार,097 रुपयाचा नगदी) मुद्देमाल गायब केला असल्याचे दिसून आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी वडते हे करीत आहेत.