ती रेल्वेच्या डब्यासारखी ये- जा करणारी वाहने एकटक बघत, कोवळ्या उन्हाचे हलकेसे कवडसे टिपत एक एक कडक चहाचा घोट घेत बरेच काही प्रश्न पडले त्यातील एक म्हणजे, ही सगळी वाहने खरच त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहचत असतील का ? हे वर्ष ही असेच गेले वाहनासारखे नाही का ? तुम्ही करता का कधी विचार या वर्षात आपण काय केले? काय गमावले? काय कमवले? नक्कीच , उठल्यापासून झोपपर्यंत विचारांचा हल्लकल्लोळ द्विधा मनस्थितीत टाकतो की यार आज हे करायचं आहे ,एवढी कामं पूर्ण करायची आहेत, ऑफिस आहे आणि वगेरे वगेरे वेळ कसा निघून जातो कळतच नाही मग आपणच मनाशी म्हणतो खूप काही करायचं होत पण राहूनच गेलं.
अगदीच, राहून गेलेल्या गोष्टींची खंत करत कुढत कुढत जगत राहतो. आपण अस केलं नसत तर हे घडलं नसत आणि स्वतःला दोष देत बऱ्या झालेल्या जखमेवरच टरफल काढून रोज त्यातच जगत राहतो या गोष्टीचा त्रास आपल्यावर आणि आपल्या भोवताली असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर होत असतो आपण सगळीकडे नकारार्थी ऊर्जेला आमंत्रण देतो आणि स्वतःशीच म्हणतो हे माझ्याच सोबत का ? नाही का ,पण हे सगळयांच सेम आहे अगदी प्रेमासारखं, ते म्हणतात ना “प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं”चला तर मग या सेम सेम वाटणाऱ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करुया.
सुरुवात पण नक्की कशाची आणि कोणापासून? स्वतःची आणि स्वतः पासून हो अर्थातच,रोज स्वतः ला सांगा हे नवीन येणारं वर्ष किंवा दिवस जीवनात खूप खूप आनंद, उत्साह,तेज,संधी,उत्तम आरोग्य ,नवे विचार,नव्या वाटा,सकारात्मक बदल अगदी पॅकेज असेल. रोज उठल्यावर स्वतःला सांगा, “माझे माझ्यावर खूप प्रेम आहे”.आरशात पाहून बोला,”मी खूप सुंदर आहे”, प्रत्येक काम करताना स्वतःला सांगा, “मी जे करत आहे ते उत्तम करते आहे”. आणि बघा मग स्वतःवर प्रेम करायला लाग्यापासून तुमच्या आयुष्यातील चमत्कार ही जादू पाहायला फक्त एक सुरुवात केली पाहिजे.. मग सगळ तुमचं नैराश्य, नकारात्मक विचार सर्व काही छु मंतर होईल. स्वतःच्या गोष्टींवर एवढं प्रेम करा की बाकीच्या गोष्टी तुम्हाला त्रास देतील असे वाटले नाही पाहिजे.. गोष्टी काहीही असतील मग तो जॉब असेल,संसार असेल,कुटुंब असेल ,छंद असतील, स्वप्न असेल, समाज असेल, गाव असेल, देश असेल It can be anything… You must have to start… तुम्हाला फक्त सुरुवात करायची आहे जगण्याची.. नव्या स्वप्नाची ,नव्या आशेची…
लीना निकाळजे