शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलं आहे. तेव्हापासून ठाकरे गटातील नेते आणि खासदार संजय राऊत निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. आता पुन्हा एकदा संजय राऊत निवडणूक आयोगावर बरसले आहेत.शिवसेना ही निवडणूक आयोगाच्या बापाची नाहीये, अशी जहरी टीका राऊतांनी केली आहे.
काल उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीतील चिपळूणमधील खेड येथे शिवगर्जना यात्रेनिमित्त जाहीर सभा पार पडली. शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन त्यांच्या यात्रेमध्ये भाजपचे भाडोत्री लोक फिरत होते. त्यांना धनुष्यबाण पेलवणार आहे का ? असा प्रश्न काल उद्धव ठाकरे यांनी विचारला. त्यावर संजय राऊत म्हणालेत की, काल कोकणात अती विराट अशी सभा होती.
या सभेनंतर अनेकांचे बोल बिघडले. शिवसेनेचे चिन्ह आणि नाव जरी गेला असलं तरी लाखो शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहे. ही खोक्याने विकत घेतलेली जनता नाही, कालच्या सभेनंतर महाराष्ट्राचा कौल फिक्स झाला आहे. कोकण आणि शिवसेनेत अतूट नातं आहे हे स्पष्ट दिसलं. आता मालेगावला उत्तर महाराष्ट्रात सभा होणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.
आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना ही निवडणूक आयोगाच्या बापाची नाहीये जी उचलावी आणि कोणाला द्यावी. ही जनतेची शिवसेना आहे. ते काय म्हणतात त्याला उत्तर द्यायची मला गरज वाटत नाही. त्यांचं स्क्रिप्ट भारतीय जनता पक्षाने लिहून दिलेलं आहे आणि भाजपच्या स्क्रीप्टनुसार मिंदे गटाचे लोक बोलतात. आम्ही अजिबात शिमगा करत नाही जनता मिंदे गटाच्या नावानं शिमगा करत आहे.’
‘देशातल्या 9 प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून कळवलं आहे, देशाची परिस्थिती नेमकी काय आहे ? सरकारविरोधात जो कोणी बोलतो त्यावर सीबीआय, इडी याचे हल्ले होत आहेत. ही काही लोकशाही नाही ही तानाशाही आहे. आमचे काम आहे जनतेसमोर आणि पंतप्रधानांसमोर ही गोष्ट मांडणं. लोकशाही धोक्यात नाही जवळपास संपली आहे, असं देखील म्हणत संजय राऊतांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.