जालना (प्रतिनिधी) – सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन(उखढण) व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या शासन निर्णयाची व 62 हजार शाळा दत्तक देण्याच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.सरकार विरोधी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. व त्या संदर्भाचे निवेदन मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री यांना देण्यात आले. त्या निवेदनात म्हटले की, सरकारने सर्व सरकारी विभागातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी खाजगी कंत्राटी कंपन्यांना देण्यात येणार्या शासन निर्णया विरोधात आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 62000 शाळा खाजगी कंपन्यांना देण्यात येणार आहेत,याचा सिटू व शेतमजूर युनियन तीव्र निषेध करतआहे.दोन्ही शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावेत.यामुळे विद्यार्थी व युवकांचे भविष्य धोक्यात आले आहे.यामुळे समाजात मोठी दुफळी निर्माण होईल. फुले,शाहू,आंबेडकरांच्या विचाराना तडा देण्याचे काम या शासन निर्णयाच्या माध्यमातून होईल.म्हणून सदरील शासन निर्णय त्वरित रद्द करावा. अन्यथा सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (उखढण) या दोन्ही निर्णयाविरुद्ध पूर्ण राज्यभर तीव्र लढा उभा करेल असा इशाराही त्यावेळी देण्यात आला. निवेदन खालील मागण्या करण्यात आल्या आहेत. 1) सर्व शासकीय विभागातील पदे कंत्राटी पद्धतीने न भरता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) द्वारा भरण्यात यावी, 2) आमदार मंत्री खासदार यांच्या हितसंबंधांतील 9 कंपन्यांना कंत्राट देण्याचा शासन निर्णय रद्द करावा, 3) महाराष्ट्रातील 62 हजार जिल्हा परिषद शाळा खाजगी कंपन्यांना देण्याचा शासन निर्णय रद्द करावा, 4) शासनाचे सर्व परीक्षा अर्ज निशुल्क स्वीकारावेत, पेपर फुटीचे प्रकार थांबवून पारदर्शकता आणावी, 5) महाराष्ट्रातील विविध शासकीय विभागात रिक्त असलेल्या 6 लाख हून अधिक पदे तातडीने भरून कायम नोकर भरती करावी, 6) राज्यात तलाठी भरतीत बर्याच ठिकाणी घोटाळा आढळून आल्याने संपुर्ण परिक्षा रद्द करून पुर्वपरिक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) किंवा सि.ई.टी सेल मार्फत घेण्यात यावी.
यावेळी कामगार नेते कॉ.अण्णा सावंत शेतमजूर युनियन चे राज्याध्यक्ष कॉ.मारोती खंदारे, व जिल्हाध्यक्ष कॉ.सरिता शर्मा, सिटू चे जिल्हा सचिव ड.अनिल मिसाळ, मदन एखंडे,सर्जेराव बरसाले,बाबासाहेब पाटोळे,हरिश्चंद्र लोखंडे,संतोष पाटोळे,संजय जगधने,भगवान कोळे,भगवान कोळे,संदीप वंजारे,गौरव चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .




















