सोलापूर । प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील यशोगाथा महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि कर्ज वाटप मेळाला संपन्न झाला.

यावेळी महिला स्वयंसहाय्यता समूहांना विदर्भ कोकण बँकेमार्फत सुमारे दीड कोटी रुपयाचे बँक कर्ज वाटप करण्यात आले. व्यवसाय करणार्या महिलांना समुदाय गुंतवणूक निधी अंतर्गत 22 लाख 80 हजार रुपये व एका उत्पादक समूहाला दोन लाख रुपये निधीचे वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या सौभाग्यवती शांभवीताई कल्याणशेट्टी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, विदर्भ केाकण ग्रामीण बँकेचे रिजनल मॅनेजर महेश मोरे, कुंभारी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, तालुका अभियान व्यवस्थापक पुनम कोनापुरे, तसेच प्रभाग संघाचे सर्व पदाधिकारी व तालुक्यातील समूहांचे महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुनम कोनापुरे यांनी केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन महिलांनी छोटे-मोठे उद्योग व्यवसाय करून आर्थिक स्तर उंच करावा, उद्योजकता विकासाकडे जास्त कल द्यावा याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी शांभवीताई सचिन कल्याणशेट्टी यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, महिलांनी सक्षमीकरणाच्या दृष्टीने कार्य करावे, जेणेकरून एकमेव महिलेचा नव्हे तर संपूर्ण गावाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. शिवाय आपण महिलांना वेळोवेळी मदत करणार असल्याचे आश्वासन भांभवीताई कल्याणशेट्टी यांनी दिले.

सदर कार्यक्रमात कृषी विभागामार्फत बियाणेही वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद चिंचुरे यांनी केले तर अलीम शेख यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तालुका व्यवस्थापन कक्षातील कर्मचारी, कृषी व्यवस्थापक, सर्व सीआरपी, बँक सखी, एफएलसीआरपी व प्रभाग संघ पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
यावेळी भाजपचे अक्कलकोट विधानसभा प्रमुख राजकुमार झिंगाडे, सरपंच श्रुती निकंबे, उपसरपंच होनराव, ग्रामपंचायत सदस्य सुतारताई, शिवानंद आंदोडगी, सूरज दादा पाटिल, जिल्हा परिषद सदस्य आणप्पा बाराचारे, बँक व्यवस्थापक श्याम दमा, ढवणे, सोलापूर कर विभागाचे महेश मोरे, कृषिअधिकारी शेळके व सोनाली नाईकनवरे, पूनम कोणापुरे, प्रमोद, साळुंखे, अलीम, रफिक, श्रीमती मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.




















