जालना – महाराष्ट्रातील लोककला जनत करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतलाय. त्यामुळे शासनाने लोककलेचे संवर्धन करण्यासाठी राज्यभरातील कलावंताच्या भेटी घ्यायला सुरुवात केलीय. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन 2023 निश्चित करण्यासाठी शासनाने लोककला उप समितीने स्थापन केलीय.
या उप समितीने राज्यभरात दौरा सुरु केलाय. त्यामुळे आज दि. 2 ऑक्टोबर 2023 रोजी या समितीने जालना येथे लोककलावंताच्या भेटी घेत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. यावेळी उप समितीचे अध्यक्ष जगन्नाथ हिलीम, रुपेश कोडीलकर, मानिक पट्टेबहादुर, डॉ. दौलत कांबळे यांनी लोककलेच्या अभ्यासक आणि लोककलावंतासोबत चर्चा केली. यावेळी लोककलावंतानी लोककला जनत करुन त्याचे संवंर्धन करण्यासाठी काय करायला हवे आणि कलावंताच्या नेमक्या समस्या काय आहेत याची सविस्तर माहिती या उप समितीच्या समोर मांडली.




















