कल्याण – रेल्वे स्थानकात ट्रेनमधून उतरताना मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर एकजण जखमी आहे. डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमधून उतरताना हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धावत्या डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधून काही प्रवाशांनी उतरण्याचा प्रयत्न केला.
कल्याण रेल्वे स्थानकावर डेक्कन क्वीन एक्सप्रेसला थांबा नाही. मात्र प्रवाशांनी तरीही धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केल्याने हा अपघात झाला. धावत्या डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधून दोन भावांनी कल्याण रेल्वे स्थानकावर उतरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक भाऊ जखमी आहे. सकाळी 9.30 च्या सुमारास ही घटना घडली.
डेक्कन क्वीन एक्सप्रेसला कल्याण रेल्वे स्थानकावर थांबा नव्हता. कल्याण रेल्वे स्थानक येताच एक्स्प्रेस स्लो झाल्याने या दोघांनी रेल्वे स्थानकावर उतरण्याचा प्रयत्न केला व त्यातूनच दुर्घटना घडली.
मयत व्यक्तीचे नाव नूर अली असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोघेही डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये पुण्याहून बसले होते, त्यांना पनवेलला जायचे होते.