जालना तालुक्यातील इंदेवाडी येथे जालना ते अंबड रोडवर एका चारचाकी वाहनाचा भिषण अपघात झाला असून त्यात एका शेडचे नुकसान झाल्याची घटना मंगळवार दि. 20 मे 2025 रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घढली. या अपघाताची माहिती मिळताच तालुका जालना पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने त्यात जिवीत हाणी झाली नाही.
जालना तालुक्यातील इंदेवाडी परिसरात जालना ते अंबड रोडवर कार क्र. टीएस 11 ई पी ही कार भरधाव वेगात जात असतांना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार रोडच्या खाली जावून शेडवर आदळली. त्यात शेडचे नुकसान झाले असले तरी जिवीत हाणी मात्र झाली नाही. या अपघातात गाडीमध्ये ड्रग्स असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मात्र पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली असता त्यात धुम्रपानाचे सिगारेट असल्याचे दिसून आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाला विचारणा केली असता त्यात ड्रग्स नसून सिगारेटचे काही पाकीटे होते अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.