जालना जिल्ह्यातून जाणार्या जालना ते नांदेड समृध्दी महामार्गावरील बाधीत झालेल्या शेतकर्यांसाठी जालना उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुनावनी घेण्यात आली. यामध्ये तीन गावातील बाधीत शेतकर्यांच्या सुनावनी दरम्यान शेतकर्यांनी आक्षेप नोंदवून फेर मुल्यांकन करण्याची मागणी केली. या संदर्भात त्यांनी सोमवार दि. 19 मे 2025 रोजी दुपारी 4 वाजता उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले.
जालना जिल्ह्यातून नांदेडला जाणार्या जालना ते नांदेड समृध्दी महामार्गावर ज्या शेतकर्यांच्या शेतजमीनी जाणार आहेत, त्यांच्यासाठी आज उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुनावनी ठेवण्यात आली होती. यामध्ये जालना तालुक्यातील शेवगा, सारवाडी (नेर) आणि धांडेगाव येथील बाधीत शेतकर्यांची सुनावनी झाली. या सुनावनी दरम्यान शेतकर्यांनी आक्षेप नोंदविला. शेतीचे मुल्यांकन करतांना शेतीमधील इतर घटकांचा विचार न करता मुल्यांकन करण्यात आले. शिवाय दिला जाणारा मावेजा हा जुन्या कायद्याप्रमाणे आहे. त्यामुळे त्यात बदल करुन नवीन मुल्यांकन करावे आणि शेतकर्यांना शेतमीनीमधील इतर घटकांचा समावेश करुन फेर मुल्यांकन करुन वाढीव मावेजा देण्यात यावा अशी मागणी शेतकर्यांनी केलीय.