जालना – तालुक्यातील रामनगर येथील एका वाहन चालकास रस्त्यावर वाहन उभा करणे चांगलंच महागात पडलंय. रस्त्यावर वाहन उभा करुन वाहतुकीस अडथळा निर्माण केल्या प्रकरणी मौजपुरी पोलीसांनी वाहनचालकावर कारवाई करुन गुन्हा दाखल केलाय.

या प्रकरण पोलीस आंमलदार कैलास सांडुजी शिवणकर हे पोलीस कर्मचारी चव्हाण, खरात यांच्यासह रामनगर साखर कारखाना येथील जालना ते मंठा हायवे रोडवर पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी दुपारी 01.30 वा सुमारास एक महींद्रा चॅम्पियन कंपनीची पॅसेंजर रिक्षा क्र चक – 21 – 1491 हे जालना मंठा हायवे रोडवरील रामनगर चौकात त्यांचं वाहन रहादारीला अडथळा निर्माण होईल अशा रितिने आणि बेजबाबदारपणे उभा करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे रस्त्यातच उभा केलं होतं. या प्रकरणी सखाराम त्र्यंबकराव कुंभकर रा सावरगाव ता जि जालना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.




















