जालना – शहरासह जिल्ह्यात बदलत्या वातावरणाने साथीच्या रुग्णात वाढ झालीय. या बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट जनआरोग्यावर झाला असून नागरिकांत सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी यासारखे आजार बळावले आहेत. त्यामुळे खाजगी रूग्णालयांसह सरकारी रूग्णालयं हाऊसफुल्ल झालीत. जिल्हा सामान्य रूग्णालयाबाहेर रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. उपचार, तपासणी, चाचणी करून घेण्यासाठी या रांगा लागल्याचं दिसून आलंय.

सध्या कोरोनाच्या नव्या र्ींरीळशपीं ने डोके वर काढलंय. आपल्याला कारोनाच्या विषाणूची लागण तर झाली नाही ना या भीतीने रुग्णांनी एकच गर्दी केल्यानं आरोग्ययंत्रणा देखील सतर्क झालीय. संभाव्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन सतर्क झालं असून 100 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली असून भविष्यात कोरोना च्या रुग्णसंख्येत वाढ झाली तर आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी सांगितलेय.




















