जालना – शहरातील साळी गल्ली भागातील भाडेकरुचे घर फोडून घरातले साहित्य चोरुन नेणार्या इसमास पेट्रोलिंग करणार्या कदीम पोलीसांनी रंगेहात पकडले असून त्याच्यावर कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या संदर्भात मोमीन अतीकुल हसन रा- साळीगल्ली जुना जालना यांनी कदीम पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की, त्यांच्या मालकीच्या साळीगल्लीतील दोन रुम मी किरायाने दिलेल्या आहेत. त्यापैकी एक रुम शेख जम्मु शेख गफुर व दुसरी रुम ही शेख अफसर शेख कलीम यांना किरायाने दिलेली आहे. शेख जम्मु शेख गफुर यांची मुलगी आजारी असल्याने उपचारकामी रुग्णालयात गेले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या घराला कुलुप लावलेले होते. किरायादार शेख जम्मु शेख गफुर यांना दिलेल्या घरासमोर पोलीसांनी एका व्यक्तीला पकडून ठेवलेले होते. फिर्यादीने त्यांच्या जवळ जाऊन पाहीले असता तो त्यांच्या ओळखीचा युसेद खान नासेर खान उर्फ जंगली रा. साळीगल्ली जुना जालना हा दिसून आला. त्यांना त्यांच्या दुसर्या किरायादाराने सांगीतलं की, जंगली ने शेख जम्मु यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न. त्यामुळे पोलीसांनी पेट्रोलींग दरम्यान त्याला पकडून ठेवलंय. या प्रकरणी युसेद खान नासेर खान उर्फ जंगली याच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरुन कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.




















