जालना – बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील एक जोडपे हे जालना शहरातील बजरंग दालमील येथे विवाह सोहळ्यासाठी आले असता त्यांच्या कारमध्ये ठवेलेल्या पर्स मधून 1 लाख 3 हजार रुपये किंमतीचे दागीने अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या प्रकरणी साखरखेर्डा ता. सिंदखेडराजा जि. बुलडाणा येथील डॉ. अभिषेक चंद्रशेखर शुक्ला यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की त्यांनी चाळीसगांव येथील त्यांचे काकाची अल्टो कार घेऊन ते जालना येथील रुख्मणीगार्डन बजरंग दालमिल समोर लग्नाच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यांच्या पत्नीने त्यांच्या जवळील सोन्याचांदीचे दागिने एका पर्समध्ये ठेवुन ती पर्स कारच्या मागच्या सिटवर ठेवली होती. तीथे कुणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने कारचा दरवाजा च्या काचा फोडुन 1 लाख 3 हजार रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागीने चोरुन नेले. या प्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.




















