जालना – शहरातील अवैध धंद्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सुचनेनुसार सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांनी कंबर कसल्याचं पहाला मिळालं. चंदनझीरा हद्दीत औद्योगीक वसाहत परिसरातील मुकेश मोहनजी ठक्कर याच्या घरातून तब्बल 63 हजार 920 रुपयाचा गुटखा जप्त केल्याची माहिती चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपुत यांनी दिलीय.
आज चंदनझीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा विक्री विरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे प्रत्येक बीट अंमलदार व अधिकारी यांनी आपापल्या हद्दीतील टपर्या तसेच माहितीच्या ठिकाणी दुकानं, टपर्या, चेक केल्या. त्यावरुन त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एमआयडीसीतील मुकेश मोहनजी ठक्कर यांच्या घरी एकूण 63 हजार 920 रुपयांचा गुटखा मिळून आला. यामध्ये गोवा, हिरा पानमसाला, राजनिवास पान मसाला, जर्दा, अलीबाबा पान मसाला आदी सुगंधी तंबाखू आढळून आलीय. तर दुसर्या कारवाईत कीर्ती ट्रान्सपोर्ट जवळ कडूबा केशवराव दाभाडे याच्याकडे देखील 5 हजार रुपयांचा गुटखा मिळवून आला. या प्रकरणी दोन्ही गुटखा बाळगणार्यावर गुन्हे दाखल करुन त्यांना गुटखा पुरवठा करणार्यालाही आरोपी करण्यात येणार असल्याचं पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी म्हटलंय.




















