जालना – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित रेवगाव येथे श्री दत्त जयंती अखंड नामजप सप्ताहाची सांगजा आज दि. 27 डिसेंबर रोजी झाली. या निमित्त सेवा केंद्रामध्ये रोज बालसंस्कार, शेतीविषयक माहिती, वास्तुशास्त्र तसेच श्री गणेशा याग, गीताई याग, स्वामी याग, रुद्र याग, चंडी याग, मल्हार याग आदी सेवा रुजू करण्यात आल्या.
तसेच या सेवा केंद्र अंतर्गत ग्राम अभियान ची सेवा देखील प्रत्येक गावामध्ये रुजू केली जाते. या सेवा केंद्रांतर्गत 17 ते 18 गावात हे अभियान घेण्यात आले. त्यामध्ये जालना तालुका, अंबड तालुका, बदनापुर तालुका, घनसावंगी तालुका आदी ठिकाणी विविध गावात जाऊन ग्राम अभियान केले जाते. तसेच बालसंस्कार देखील सर्व केंद्रात घेतले जातात. दत्त जयंती सप्ताह जिल्हाभरात खूप मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्याचबरोबर जानेवारी महिन्यात जागतिक कृषी महोत्सव देखील भरविण्यात येणार आहे. दिनांक 24 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान सर्व शेतकर्यांसाठी हा उपक्रम व प्रदर्शन आयोजित करण्यात आलाय.




















