कुंभारी :- दक्षिण तालुक्यातील दोड्डी तांडा येथे बंजारा समाजाचे धर्मगुरु श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी विविध कार्यक्रमांसह गावातून शोभायात्रा काढण्यात आली होती. या प्रसंगी फटाक्यांची आतषबाजी व ‘जय सेवालाल’च्या जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमले होते.

श्री संत सेवालाल महाराज यांचा जयंती दोड्डी तांड्यामध्ये मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. श्री संत सेवालाल महाराज मंदिर येथे गावातील महिला पुरुष वर्गाने एकत्र येऊन संत सेवालाल महाराज यांचे पूजा करून नैवेद्य अर्पण केले. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. रात्रीला भजन कीर्तन नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील उपसरपंच विशाल राठोड, तारासिंग राठोड, अनिल राठोड, हरिश्चंद्र जाधव, शंकर राठोड, बाबू राठोड, विमल राठोड उपस्थित होते.
शोभायात्रेने वेधले लक्ष
सर्वप्रथम तांड्यात सकाळी संत सेवालाल महाराजांची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत वेगवेगळे देखावे सादर करण्यात आले आणि फटाक्यांची आतषबाजी करून बंजारा संस्कृतीचे पेहराव घालून महिलांनी जुन्या चालीरीतीचे गीत गायन केले व पुरुषांमध्ये भजन व इतर संस्कृती गीते सादर करून मिरवणूक काढण्यात आली. उत्सव व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी दत्ता राठोड, सुभाष राठोड, बेबी राठोड, गंगलाबाई राठोड, शांताबाई राठोड, रेखा राठोड, उमेश राठोड आदींनी परिश्रम घेतले.




















