लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था आयोजित कुंभारी शाखेच्या हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कुंभारी गावच्या सरपंच कुमारी श्रुती सुभाष निकंबे व प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डाँ. सुमय्या पटेल या उपस्थित होत्या. तसेच आशा वर्कर सुपरवायझर रंजना सपकाळ व बिराजदार ताई उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात गावातल्या अनेक महिला उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय अधिकारी मीनाक्षी पाटील यांनी केले तसेच प्रास्ताविक मध्ये विभागीय अधिकारी निकम मॅडम यांनी बोलताना म्हणाल्या पतसंसस्था 63 शाखेतून कार्यरत असून पतसंस्थेने 2100 कोटी व्यवसाय पूर्तता केले असे सांगण्यात आले. व या निमित्ताने उपस्थित महिलांसाठी नवीन आवर्तक योजनेची माहिती दिली. या ठिकाणी महिलांना कॅलेंडर अहवाल व हळदीकुंकू वाचे वाण वाहून सन्मान करण्यात आला. कुंभारी गावात महिलांचा छान प्रतिसाद मिळाला तसेच इतर महिलांसाठी विविध खेळ घेण्यात आले. आभार प्रदर्शन निकम मॅडम यांनी मांडले सदर कार्यक्रमास लोकमंगलच्या कुंभारी शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





















