कुंभारी :- शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुखपदी यशस्विनी ऍग्रो प्रोडूसर कंपनीच्या अध्यक्ष अनिता माळगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र बाळासाहेब भवन मुंबई येथे मनीषा ताई कायंदे शिवसेनेचे सचिव मीनाताई कांबळे, शितलताई म्हात्रे, शिवसेना प्रवक्ते ज्योतीताई वाघमारे , इरफान भाई यांच्या उपस्थितीत माळगे यांना देण्यात आले व पक्ष वाढीकरता काम करतील असा विश्वास त्यांच्यावर वर्तविला.
आगामी 2024 च्या निवडणुका लक्षात घेता शिवसेने द्वारे सोलापूर लोकसभेला विशेष महत्त्व दिले जात असून येथे शिवसेना पक्ष वाढीकरिता हालचाली सुरू झाल्या आहेत. ही जबाबदारी अनिता माळगे यांना देण्यात आली आहे. नियुक्तीनंतर माळगे सांगितले की पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवून दिलेली जबाबदारी निभावणे हे माझे कर्तव्य आहे. पक्ष वाढीसाठी पूर्ण निष्ठा ठेवून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.