जालना शहरातील सदरबाजार पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेले मोबाईल तांत्रीक तपास करुन शोधून काढण्यात पोलीसांना यश आलंय. सदरबाजार पोलीसांनी शोधून काढलेले मोबाईल आज बुधवार दि. 27 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजता उप विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या हस्ते परत करण्यात आलेत.
केंद्रीय दुरसंचार विभाग भारत सरकार यांचेकडून उ.ए.ख.ठ. हि प्रणाली सुरु करण्यात आली आहे. सदर प्रणाली मध्ये चोरी गेलेले व हरवलेले मोबाईल तक्रारदार यांना परत मिळवुन देणे हे मुख्य उदीष्ट आहे.
त्याअनुषंगाने सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी गेलेल्या व हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारी उ.ए.ख.ठ. पोर्टल मध्ये तक्रारदारांनी सदर बाजार पोलीस ठाण्यातील आंमलदार यांच्या मार्फत दाखल केल्या होत्या. उ.ए.ख.ठ. पोर्टल करुन चोरी गेलेल्या व हरवलेल्या मोबाईलची माहिती प्राप्त करुन त्याचे तांत्रिक विश्लेषन करून एकूण 73 तक्रारी मध्ये 10 लाख 95 हजार रुपये किंमतीचे 73 मोबाईल तक्रारदार यांना परत करण्यात आलेत. यामध्ये डर्राीीपस,, झेलले, जििे, ठशवाळ, तर्ळीें आदी कंपनीचे मोबाईल आहेत. मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केलंय. ही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बंन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, उप विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव, भगवान नरोडे, पोलीस कर्मचारी गिरीष शिंगणे, अजीम शेख, भरत ढाकणे, प्रदिप करतारे, अनिल काकडे यांनी केलीय.