जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना येथुन 8 किलो 182 ग्रॅम. वजानाचा गांजा सह 7 लाख 32 हजार 640 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपी जेरबंद करण्यात आलेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने दि. 28 मार्च 2024 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास कारखाना परिसरातील हॉटेल लंका पॅलेस समोर करण्यात आली असल्याची माहिती आज शुक्रवार दि. 29 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. रामेश्वर खनाळ यांनी दिलीय.
रामनगर साखर कारखाना येथे काही इसम एका स्वीफ्ट डिझायर कारमध्ये गांजा घेवुन विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शोखेच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी त्यांच्या पथकासह दि. 28 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास रामनगर साखर कारखाना येथे छापा मारला. यावेळी जालना-मंठा रोडवरील हॉटेल लंका पॅलेसच्या समोर उभा असलेल्या एका पांढर्या रंगाच्या स्वीफ्ट कार क्रमांक चक-41-त-3361 संशयीत कार मिळून आली. त्यामध्ये गणेश गोपनीथ सोळुंके रा. सोयंजना ता. परतुर जि. जालना, प्रदीप सिताराम फुलमाळी रा. साठेनगर परतुर ह. मु.लोकमान्य टिळक नगर पाडा नं.5, ठाणे असे दोन आरोपी पॅकींग केलेल्या गांजासह मिळुन आले. दोन्ही आरोपींच्या ताब्यातुन 8 किलो 182 ग्रॅम गांजा, व गांजा वाहतुक करण्यासाठी वापरलेली कार व मोबाईल असा एकुण 7 लाख 32 हजार 640 रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आलाय. पोलीसांनी एकुण 04 आरोपी विरुध्द मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सपोनि शांतीलाल चव्हाण, योगेश उबाळे, पोलीस अंमलदार कृष्णा तंगे, रमेश राठोड, रुस्तुम जैवाळ, सुधीर वाघमारे, संभाजी तनपुरे, फुलचंद गव्हाणे, सतीष श्रीवास, सचीन आर्य, भागवत खरात, धम्मपाल सुरडकर, रमेश पैठणे यांनी केलीय.