घनसावंगी : ग्रामीण भागातील शेवटच्या गरीब घटकांपर्यंत पोहचून आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा स्वयंमसेविकांच्या मानधनात सरकारने ५ हजाराची वाढ केली.आशा स्वयंमसेविकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न केल्याबद्दल भाजप नेते तथा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांचा आशा स्वयंमसेविका संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागातील शेवटच्या गरीब घटकापर्यंत शासनाची आरोग्य सेवा पोहोचवण्याबरोबरच सामाजिक व आरोग्याच्या महत्त्वकांशी अभियानात आशा स्वयंमसेविका नेहमी आघाडीवर असतात. आशा स्वयंसेविका गेल्या अनेक वर्षापासून मानधन वाढीसाठी लढा देत होत्या. भाजप नेते सतीश घाटगे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून आशा स्वयंसेविकेच्या मानधनाचा जिव्हाळ्याचा प्रश्न सरकार दरबारी मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. अशा स्वयंसेविकेच्या मानधनात राज्य सरकारने पाच हजार रुपयाची वाढ केली आहे. आशा स्वयंसेविकेचा जिव्हाळ्याचा प्रश्न सरकारने सोडवल्याबद्दल व मानधन वाढीसाठी सरकारकडे प्रयत्न केल्याबद्दल घनसावंगी मतदार संघातील आशा स्वयंसेविकांनी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला. घनसावंगी विधानसभेच्या महिला संयोजक अर्चनाताई सोसे, भाजपा कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष गोविंद आर्दड, आशामती आव्हाड, वनिता भांगे, महानंदा खंदारे, दुर्गा कुटे, हिरा पटेकर, रेखा नागरे, अनिता जवळकर, आशामती बोराडे, अर्चना खोजे, यमुना अस्वले, वर्षा ईघारे, छाया वैद्य, राधा काकडे, मंगल लहाने, मनकर्णा बिल्हारे, छाया गुरव, स्वामिनी नाटकर, कुंदाताई बादल ,चैताली वनगुजरे, माधुरी टोम्पे, वृंदा सुरसे आशा स्वयंमसेविका उपस्थित होत्या.