कुंभारी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील जामा मस्जिदमध्ये प्रहार संघटनेच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी पार पडली. यावेळी भाजप, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना, प्रहार, एमके फाउंडेशन यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाल्याने सर्व पक्ष समभावाचे दर्शन घडले.
प्रहार युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहसिन तांबोळी आणि एमटी फाउंडेशनच्या वतीने या रोजा इतकार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सनगल्ले, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे, उद्योगपती महेश बिराजदार, रिपाइंचे अविनाश मडीखांबे, सुनील बंडगर, सरपंच जगदीश अंटद, माजी सरपंच श्रीशैल दुधगी, प्रा. महादेव होटकर, सहाय्यक फौजदार अशोक पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व पदाधिकारी सहभागी झाले होते.