जालना ( प्रतिनिधी): मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रगेडचा मराठवाडा संवाद दौरा आणि प्रदेश कार्यकारिणीची बैठक भाग्यनगर परिसरातील मराठा सेवा संघ कार्यालयातील भाऊसाहेब देशमुख सभागृहात शुक्रवारी ( ता. 29) संपन्न झाली.
बैठकीस जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा शिवमती सीमाताई बोके, ज्येष्ठ मार्गदर्शक सत्यभामा पाटील, महासचिव राधा कडवकर, प्रदेश कार्याध्यक्षा विभावरी ताकट, राजश्रीताई शितोळे, उपाध्यक्षा वर्षाताई माने, कालिंदीताई ठुबे पाटील, प्रसिद्धी प्रमुख वैशालीताई कडू , प्रवक्त्या रेखाताई सुर्यवंशी, प्रदेश संघटिका ताई बोराडे, प्रदेश सदस्या वंदनाताई आखरे , लताताई बावणे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रदेशाध्यक्षा शिवमती सीमाताई बोके, सत्यभामा पाटील आदींनी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण ,सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना संघटित करून एकल महिलांना आधार देणे आणि जिजाऊ ब्रिगेडचे संघटन वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले. नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यात जालना जिल्हाध्यक्षा सीमाताई काकडे -गंगाधरे, छत्रपती संभाजीनगर संगीताताई भुजंग, मेघा थोरात, बीड -राधा सपकाळ , सुवर्णा गिऱ्हे, लातूर -अर्चना पाटील, समाधानताई माने,नांदेड- सुमित्रा वडजकर, तसेच लातूरच्या विभागीय अध्यक्षपदी रंजना चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्षा सीमाताई काकडे यांनी महिलांना अंधश्रद्धा, कालबाह्य रूढी -परंपरा यातून बाहेर काढत संस्कारी, विज्ञानवादी समाज निर्मितीचे कार्य जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून होत असल्याचे स्पष्ट केले. जिजाऊ वंदनेने बैठकीस प्रारंभ झाला.
सूत्रसंचालन सीमा बागल यांनी केले तर वैशाली देशमुख यांनी आभार मानले.
यावेळी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष संदिपान जाधव, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे पाटील ,संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हाध्यक्षा दिपालीताई दाभाडे पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष मिसाळ, जिल्हा सचिव प्रा.डॉ. गजानन देशमुख,मराठा सेवा संघाचे माजी जिल्हा सचिव काकासाहेब खरात,शितलताई तनपुरे , रत्नमाला जाधव, अनिताताई फलके ,प्रयागबाई काकडे, ज्योत्सना देशमुख, मंजुश्री झोडगे, संतोषी शिरसाठ, सुवर्णा राऊत -वाघ, निर्मला पडोळ, तांदळे यांच्यासह जिजाऊ ब्रिगेड च्या विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व महिला सदस्यांची उपस्थिती होती.