कुंभारी :- होळी पोर्णिमेनंतर पाच दिवसांनी येणाऱ्या पंचमीला रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. यंदाची रंगपंचमी युवकांनी अत्यंत उत्साहात विविध रंगाची उधळण करीत साजरा केला.
कुंभारी व परिसरात यावर्षी नेहमीप्रमाणे रंगाने भरलेले टिप, पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासडी खूप कमी प्रमाणात दिसून आली. कुंभारी व परिसरात तुरळक ठिकाणी वाद्य वाजवले गेले, परंतु डिजेचा ठणठणाट कुठेही दिसून आला नाही. रंग खेळणाऱ्यांच्या गटातील लोकांची संख्याही जास्त होती. प्रत्येक गल्लीत पार्किंग, घरासमोर अंगण, मोकळ्या जागेत रंग खेळण्यात आले. चौका-चौकांत समुह मोठ्या प्रमाणात होते. कुंभारी व परिसरात देखील रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षी महिलांनी देखील आपला सहभाग नोंदवला. गल्लीबोळात लहान मुले रंगपंचमीचा आनंद लुटांना दिसत होते. या आनंदात भर टाकली ती युवकांच्या खास सेलिब्रेशनने या वेळेची रंगपंचमी कशा पद्धतीने साजरी करायची याचे नियोजन काही जणांनी आधीच केले होते.
रंगपंचमीच्या उत्साहात महिलांचा सहभाग
मित्रमैत्रिणींना घरी जाऊन रंग लावण्याची पद्धत असल्याने दुचाकीवरून रंग लावलेले युवक मंडळी ये-जा करत असल्याचे दिसत होते. लाल, हिरवा, पिवळा, सोनेरी, निळा, अशा विविध रंगाने भिजून फिरतांना आनंद लुटतांना दिसत होते. रंगपंचमीच्या उत्साहात सुध्दा महिलांनी आपला सहभाग नोंदवून रंगपंचमीचा आनंद लुटला.