जालना शहरातील जुना जालना भागातील गणपती गल्ली परिसरात असलेले एसबीआय बँकेचे एटीएम फोडून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न करणार्या 3 संशयीत चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असल्याची माहिती गुरुवार दि. 6 जून 2024 दुपारी 12 वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी दिलीय.
दिनांक 05 जून 2024 रोजी रात्री 3 वाजेच्या सुमारास गणपती गल्ली, जुना जालना येथील एसबीआय बँकेचे एटीएम मशिन फोडून मशीनमधील वायर तोडुन रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी बँकेचे अधिकारी संतोष सत्यनारायण गारोल यांच्या फिर्यादीवरुन कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष तपास पथके तयार करुन तपास सुरु केला असता अवघ्या 12 तासातच तांत्रिक विश्लेषणानंतर माहितीच्या आधारे संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. आदित्य आनंद नवगिरे, रा. सुवर्णकारनगर, जालना, धनंजय अशोक उदावंत, रा. गणपती मंदीरच्या पाठीमागे, सुवर्णकार नगर, जालना, राहुल राजकुमार मुख्यदल, रा. गणपती मंदीरजवळ, सुवर्णकार नगर, जालना असं ताब्यात घेतलेल्या संशयीत आरोपीची नावे आहेत. गुन्हयाचे अनुशंगाने त्यांची विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल देखील जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, रामप्रसाद पव्हरे यांनी केली.