जालना तालुक्यातील ढगी येथील आदीवासी समाजाच्या वस्तीसाठी विज पुरवठा दिल्यानंतर पुन्हा तो खंडीत करुन गोरगारीब आदिवासी लोकावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने करण्यात आलाय. या आदीवासी कुटुंबावर होणारा अन्याय तात्काळ दुर करुन त्यांच्या वस्तीचा खंडीत करण्यात आलेला विज पुरवठा पुन्हा सुरळीत सुरु करावा आणि दोषी अधिकार्यावर कारवाई करावी अशी मागणी बुधवार दि. 3 जुलै 2024 रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आली.
आदीवासी कुटुंबांना तात्काळ विज पुरवठा करण्याचे आदेश असतांनाही त्यांना सुरु केलेला विज पुरवठा स्थानिक लाईनमन आणि अभियंता यांनी आदीवासी कुटुंबावर अन्याय केलाय. शिवाय पोलीसांना खोटी माहिती देऊन आदीवासी कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल केलेत असा आरोप भारतीय कम्युनिष्ट पक्षाने दिलेल्या निवेदनात करण्यात आलाय. सदरील विज पुरवठा सुरु करण्यासाठी आदीवासी कुटुंबाकडून दिड लाख रुपये घेऊन वस्तीपर्यत डीपी आणि विद्युत पोल देखील लावण्यात आले होते, परंतु, लावण्यात आलेले पोल आणि बसविण्यात आलेली डीपी ही काढून घेऊन पुरावा नष्ट करण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आलाय.