लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त बुधवार दि. 3 जुलै 2024 रोजी रात्री 8 वाजता नुतन वसाहत येथील लहुजी नगर येथे बैठक पार पडली. या बैठकीत लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नीरज भालेराव यांची तर सचिव पदी बबलू छत्रे यांची निवड करण्यात आलीय.
यावेळी उर्वरीत कार्यकारीणीमध्ये उपाध्यक्ष पदी अविनाश लोंढे, कोषाध्यक्ष विशाल जाधव, खजिनदार रवी गवळी यांची निवड करण्यात आली. ही निवड लहुजी नगर येथील सर्व तरुण मंडळाच्या एकमताने करण्यात आली. यासाठी एक कमिटी तयार करण्यात आली. यावेळी मनोज गुढेकर, महेश जाधव, शाम सराटे, आकाश लोंढे, दिनेश पाटोळे, दीपक छत्रे, सुरज घोडे, विकी लोंढे, किरण वानखडे, राहुल खंदारे, लखन धोत्रे, ईश्वर लोंढे, शुभम गायकवाड, प्रमोद ससाने, सचिन वानखडे यांच्यासह लहुजी नगर मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.