जालना जिल्ह्यात फळबाग नसतांनाही त्यांना फळपिक विम्याचा लाभ देणार्या आणि घेणार्यावर कारवाई करावी या मागणीसाठी बुधवार दि. 3 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजता महाराष्ट्र किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने आंदोलन केलं.
जालना जिल्ह्यात पिकविमा कंपन्याचे अधिकारी हे आर्थिक हितसंबंध जोपासून बोगस पिक विमा लाभार्थ्यांना लाभ देतात, ज्यांच्याकडे फळबाग नाही, अशा बोगस लाभार्थ्यांना पिकविम्यात समाविष्ट करुन भ्रष्टाचार करीत आहेत. पंरतु, सोयाबीन, कापसाचा विमा भरणार्यांना खर्या गरजवंतांना विमा मिळत नाही. या भ्रष्टाचारात सहभागी विमा कंपनीच्या अधिकार्यासह शासकीय सेवेत राहुन बोगस लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणार्या दोषी अधिकार्यावरही कारवाई करावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली. यावेळी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने आंदोलन करुन घोषणाबाजी केली.