चिमुकल्याची गळा आवळून हत्या झाल्याचं प्रकरण समोर आल्यानं संपूर्ण भिवंडी हादरली आहे. ठाणे-कळवा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेलेल्या चिमुकल्याची गळा आवळून हत्या झाल्याचं शवविच्छेदनात स्पष्ट झालं आणि एकच खळबळ परसली. दाखल झालेल्या गुन्ह्यात नारपोली पोलिसांनी शिताफीनं कन्नड जिल्हा संभाजीनगर येथून एकाला अटक केली असल्याची माहिती मिळत आहे.
नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अमोल चव्हाण (वय 22) असं अटक करण्यात आल्याचं आरोपीचे नाव आहे.तर सुधीर विष्णू पवार वय 6 असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे येथील इमारतीच्या छतावर सहा वर्षीय सुधीर हा बेशुद्ध अवस्थेत असल्यानं त्यास कळवा येथील रुग्णालयात उपचारासाठी तेथील अमोल चव्हाण हा घेऊन गेला. तिथे सुधीर यास चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याचे सांगितलं. परंतु तपासणीमध्ये चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्यानंतर डॉक्टरांनी चिमुकल्याचं पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवलं. त्यातून धक्कादायक गोष्ट समोर आली.
चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाल्यानं डॉक्टरांनी शवविच्छेदन केलं. अहवाल समोर आल्यानंतर सुधीरची गळा आवळून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर नारपोली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कसून तपास सुरू केला. त्यानंतर हत्या करुन चिमुकल्याला रुग्णालयात दाखल केलं आहे.
तो मयत असल्याचं स्पष्ट झाल्यानं डॉक्टरांनी शवविच्छेदन केले असता सुधीरचा गळा आवळून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर नारपोली पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, हत्या झाल्यापासून तेथील अमोल चव्हाण हा फरार असल्याचं समजल्यावर पोलीस पथकानं कन्नड संभाजीनगर येथे जाऊन नातेवाईकांकडे लपून बसलेल्या आरोपी अमोलच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीनं आपला गुन्हा कबुल केला.
21 जुलै रोजी आरोपी अमोल चव्हाण यानं सुधीरची मोठी बहीण चंपा हिचेसोबत छेडछाड आणि मारहाण केली होती. सुधीरनं पाहिल्यानं अपना ही घटना आईवडिलांना सांगणार असं सांगितल्यानं आरोपी अमोल चव्हाण यानं सुधीर विष्णु पवार यांस त्याच इमारतीच्या छतावर नेऊन गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तो बेशुद्ध असल्याचा बनवा करून त्यास उपचारासाठी कळवा ठाणे येथील रुग्णालयात घेऊन गेल्याचं कबूल केल्यानं पोलिसांनी अमोल चव्हाणला हत्ये प्रकरणी गुन्ह्या दाखल केला आहे. तसेच, अवघ्या 24 तासांत अटक केली आहे.