जालना तालुक्यातील लोंढेवाडी शिवारात एका 30 वर्षीय तरुणाचा रेल्वे इंजिन समोर आल्यारे धक्का लागून मृत्यु झाल्याची घटना शुक्रवार दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता घडली. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्युची नोंद करण्यात आली.

या प्रकरणी रेल्वे कर्मचारी अशोक कुमार यांनी तालुका जालना पोलीसांना माहिती दिली होती. त्यामुळे पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केलाय. पोलीसांनी केलेल्या पंचनाम्यात किरण श्रीधर खरात, रा. अंतरवाली राठी. ता. घनसावंगी जि जालना असं मयत तरुणाचा नाव असल्याचं आढळून आलंय. किरण श्रीधर खरात हा अचानक रेल्वे इंजिन च्या समोर आला. त्यामुळे रेल्वे इंजिनचा चा धक्का लागुन त्याचा मृत्य झाल्याचं अशोक कुमार यांनी पोलीसांना सांगीतलं.




















