Friday, July 10, 2026
सभासद नोंदणी
Hirkani News
Advertisement
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
TV News
E-Paper
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
No Result
View All Result
Hirkani News
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
  • सभासद नोंदणी
Home महाराष्ट्र जालना - छत्रपती संभाजीनगर

जिल्हाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेवून चांगले काम करण्याचा प्रयत्न –  पालकमंत्री अतुल सावे

हिरकणी टीम by हिरकणी टीम
October 14, 2024 2:01 PM
A A
जिल्हाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेवून चांगले काम करण्याचा प्रयत्न –  पालकमंत्री अतुल सावे
100
VIEWS

 जालना  : जालना जिल्ह्याच्या मागील दोन वर्षात विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेवून नेहमीच चांगले काम करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहूजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.

राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज जिल्हा क्रिडा संकुल टप्पा 2 आणि जिल्हा नियोजन समिती सभागृहाच्या लोकार्पण सोहळाप्रसंगी श्री. सावे बोलत होते. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार राजेश राठोड, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे,  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, पंडित भुतेकर, औदूंबर बागडे, भाऊसाहेब घुगे, अण्णासाहेब चित्तेकर, रविंद्र तौर, मिर्झा अन्वर बेग, भाऊसाहेब गौरे, बाबासाहेब इंगळे, योगेश रत्नपारखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी  सावे म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात विविध विकासाची कामे करण्यात आली आहे. जिल्ह्यातील क्रिडा संकूलाच्या विकासाचे कामे अनेक वर्षापासून प्रलंबीत होती. क्रिडा क्षेत्रातील खेळाडूंची गरज पाहून तसेच पंतप्रधान मोदी यांनी क्रिडा क्षेत्राला दिलेले विशेष महत्व लक्षात घेवून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून टप्पा 1 अंतर्गत आज टेनिस कोर्ट, सिंथेटिक बॉस्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल मैदान, कबड्डी मैदान, खो-खो मैदान, सिंथेटिक स्केटींग रिंग व मिनी स्केटींग रिंग, आर्टीफिशियल क्रिकेट टर्फ, रिफरबीशमेंट ऑफ एक्झीस्टींग जिम हॉल, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते इत्यादी सुमारे तीन कोटी अठ्ठयाऐंशी लक्ष रुपयांचे कामांचे लोकार्पण तर  टप्पा 2 मधील 400 मीटर सिंथेटीक ट्रॅक, नॅचरल ग्रास फुटबॉल मैदानासह इतर अनुषंगीक बाबीच्या बारा कोटी वीस लक्ष रूपयांच्या कामांचे भुमिपुजन करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिडा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

तसेच जालना जिल्ह्यासाठी सुमारे 23 कोटी रुपये खर्च करुन अत्याधुनिक असे जिल्हा नियोजन भवन उभारण्यात आले आहे. यामध्ये फर्निचर, सजावट, वातानुकलीत यंत्रणा, सोलार रुफटॉप, डिजिटल ऑडियो कॉन्फरन्स व व्हिडिओ सिस्टीम, जिल्हाधिकारी यांचे दालन, अभ्यागतांसाठी प्रतिक्षा दालन अशा सुविधा उपलबध करुन देण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन भवन आणि क्रिडा संकुलाच्या कामात जिल्हाधिकारी श्री. पांचाळ यांनी विशेष लक्ष देवून हि कामे करुन घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. या कामामुळे जालना जिल्ह्याच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे.

 पालकमंत्री म्हणुन मागील दोन वर्षाच्या कालाधीत जिल्हा विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेत नेहमीच चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. पोलिस विभागाला 40 वाहने आणि सीसीटीव्हीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. आरोग्य विभागास मॉड्यूलर शस्त्रक्रिया विभागासाठी निधी उपलब्ध करुन दिला. तर जलजीवन करीता 500 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. नुकतेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन झाले असून, केंद्र शासनाने याकरीता 160 कोटी निधी मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या कालावधीत डीएमआसीमध्ये सुमारे 52 हजार कोटींची औद्योगिक प्रकल्प उभारले जाणार असुन, यामधुन सुमारे 30 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे जालना आणि छत्रपती संभाजीनगरचा मोठ्या प्रमाणात विकास होणार असल्याचे श्री. सावे यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री पांचाळ यांनी या लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक केले. तर खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार नारायण कुचे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार संतोष दानवे, आमदार राजेश राठोड यांची यावेळी क्रिडा संकुल आणि जिल्हा नियोजन भवन लोकार्पण सोहळ्याच्या अनुषंगाने समयोचित भाषणे झाली.

यावेळी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण, दिवंगत उद्योगपती रतन टाटा आणि दिवंगत माजी आमदार बाबा सिद्दीकी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, कार्यकारी अभियंता स्मिता पवार, जिल्हा क्रिडा अधिकारी संजय गाढवे, खेळाडू, कंत्राटदार आदींचा सत्कार करण्यात आला.

या लोकार्पण कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, सार्वजनीक बांधकाम कार्यकारी अभियंता स्मिता पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सूर्यवंशी, जिल्हा क्रिडा अधिकारी संजय गाढवे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी नागरिक यांची यावेळी उपस्थिती होती.

Previous Post

जनतेसाठी मैदानात उतरणार, सतीश घाटगे यांची भूमिका जाहीर

Next Post

शहरातील नुतन वसाहत येथील महापालिकेच्या जलकुंभात आढळला मृतदेह

हिरकणी टीम

हिरकणी टीम

अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत. संपर्क : 9850516724 मेल आयडी : hirkaninews@gmail.com वेब : www.hirkani.in

Related Posts

पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द
महाराष्ट्र

पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द

June 27, 2026
111
तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! पुणे दारूकांडानंतर भिवंडीत मोठी कारवाई
पुणे - सातारा

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! पुणे दारूकांडानंतर भिवंडीत मोठी कारवाई

May 30, 2026
111
परभणी-पाथरी महामार्गावर भीषण अपघात; मानवतच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू
नांदेड - परभणी

परभणी-पाथरी महामार्गावर भीषण अपघात; मानवतच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू

May 30, 2026
100
मुलगा बरा व भावाचे लग्न लावतो म्हणत 6.5 लाखांची फसवणूक
क्राइम

मुलगा बरा व भावाचे लग्न लावतो म्हणत 6.5 लाखांची फसवणूक

May 30, 2026
100
हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या
जालना - छत्रपती संभाजीनगर

हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा व धनगर समाजाला एसटी आरक्षण द्या

December 14, 2025
105
जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू
जालना - छत्रपती संभाजीनगर

जालना-मंठा रोडवर चारचाकीची जोरदार धडक; पिरकल्याण प्रकल्पातील पांडुरंग गायकवाड यांचा जागीच मृत्यू

December 13, 2025
110
Next Post
शहरातील नुतन वसाहत येथील महापालिकेच्या जलकुंभात आढळला मृतदेह

शहरातील नुतन वसाहत येथील महापालिकेच्या जलकुंभात आढळला मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest
जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

February 12, 2024
जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

February 4, 2024
Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

December 29, 2022
Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

April 6, 2024
Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

1
जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतक-याची मागणी; पाटबंधारे विभागाला दिले निवेदन

जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतक-याची मागणी; पाटबंधारे विभागाला दिले निवेदन

0

Hands on: Samsung Galaxy A5 2017 review

0

The Last Guardian Playstation 4 Game review

0
पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द

पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द

June 27, 2026
तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! पुणे दारूकांडानंतर भिवंडीत मोठी कारवाई

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! पुणे दारूकांडानंतर भिवंडीत मोठी कारवाई

May 30, 2026
परभणी-पाथरी महामार्गावर भीषण अपघात; मानवतच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू

परभणी-पाथरी महामार्गावर भीषण अपघात; मानवतच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू

May 30, 2026
मुलगा बरा व भावाचे लग्न लावतो म्हणत 6.5 लाखांची फसवणूक

मुलगा बरा व भावाचे लग्न लावतो म्हणत 6.5 लाखांची फसवणूक

May 30, 2026

चालू घडामोडी

पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द

पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द

June 27, 2026
111
तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! पुणे दारूकांडानंतर भिवंडीत मोठी कारवाई

तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! पुणे दारूकांडानंतर भिवंडीत मोठी कारवाई

May 30, 2026
111
परभणी-पाथरी महामार्गावर भीषण अपघात; मानवतच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू

परभणी-पाथरी महामार्गावर भीषण अपघात; मानवतच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू

May 30, 2026
100
मुलगा बरा व भावाचे लग्न लावतो म्हणत 6.5 लाखांची फसवणूक

मुलगा बरा व भावाचे लग्न लावतो म्हणत 6.5 लाखांची फसवणूक

May 30, 2026
100
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी

© 2024 हिरकणी - All Rights reserved.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.

Visitors

N/A

हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड

आमच्या बद्दल

11hirkani

Your Digital Partner

महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more

संपर्क तथा तक्रार अधिकारी

मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com

Quick Links

Menu
  • About Us
  • Terms and Conditions
  • Privacy-Policy
  • Advertise with us
  • Subscribe

डाउनलोड करा हिरकणी ॲप

google-play-badge

Follow us

आमचे पार्टनर

इंडीयन फास्ट

उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

शेतकरी कॉर्नर

कल्याणम वधु वर सुचक केंद्र

© 2024 हिरकणी - All Rights reserved.