जालना जिल्ह्यात केवळ 40 टक्के जलसाठा सिल्लक आहे आणि अजून 4 महिन्याचा उन्हाळा जाणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या अनुषंगाने नियोजन झाले असून जनतेने पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मंगळवार दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता केलंय.
पाणी टंचाईच्या अनुषंगाने तालुकास्तरावर आमदारांच्या अध्यक्षतेखाली बैठका झाल्या असून पाणी टंचाईच्या अनुषंगाने बीडिओ, तहसीलदार एसडीओ यांच्या समित्याही कार्यरत आहेत. प्रत्येक भागाचा पाणीसाठ्याच्या संदर्भात आराखडा तयार झालेला आहे. चार महिन्यांमध्ये पाण्याचं नियोजन कसं असेल? सिंचनासाठी किती उपलब्ध करून द्यायचं आणि त्याच पद्धतीने पाणीसाठा किती राखीव ठेवायचा याचे नियोजन प्राथमिक स्वरूपामध्ये झालेलं आहे. त्याच पद्धतीने टँकरची आवश्यकता किती पडू शकते? याचा देखील प्राथमिक अंदाज जिल्हा परिषद आणि नगरपालिकांनी तयार केलेला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये परिस्थिती बरी आहे. मागच्या वर्षी जास्त दुष्काळ होता, परंतु पाण्याचा वापर व्यवस्थित जपून वापरणे आवश्यक आहे. असेही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी म्हटलंय.




















