जालना शहरानजीक होऊ घातलेल्या सिडको प्रकल्पात शेतजमीनी संपादीत करतांना शेतकर्यांसोबत दुजाभाव केला जात आहे. तो योग्य नाही. सिडकोसाठी जमीनी संपदीत करतांना जुन्या शेतकर्यांना जो दर दिला, तोच दर नव्याने संपादीत करण्यात येणार्या शेतजमीनीला मिळावा अशी मागणी खा. डॉ. कल्याण काळे यांनी मंगळवार दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी केलीय.
सिडको प्रकल्पाबाबद अनेकदा निर्णय बदलले गेले. आता काहीतरी चौकशीचा विषय आला, त्यामुळे शेतकरी आणि स्थानिक लोकांची काय भुमीका आहे? त्याची माहिती घेण्यासाठी खा. डॉ. कल्याण काळे यांनी आज खरपूडी येथे भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. दरम्यान जिल्हाधिकारी, सिडकोचे प्रशासक यांची मिटींग लावून त्यांना शेतकर्यांच्या मागण्या अवगत करुन देणार आहे आणि मुख्यमंत्र्याला ही विनंती करुन शेतकर्यांना जुन्या शेतकर्यां प्रमाणेच मोबदला द्यावा अशी मागणी करणार असल्याचेही खा. कल्याण काळे यांनी सांगीतले.




















