जाफ्राबाद प्रतिनीधी – तालुक्यातील हिवरा पहाडी या गावात खुलेआम अवैध दारू विक्री केली जाते त्यामुळे गावातील व परिसरातील युवक दारूच्या आहारी जाऊन आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहेत तसेच कित्येकांचे संसार दारू मुळे तुटले आहेत ,विक्री करण्यांना वारंवार समज देऊन ही जैसे थे सुरूच आहे त्यामुळे आज पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे सहायक पोलिस अधीक्षक यांना निवेदन देखील देण्यात आले.
गावात अवैध्य दारू विक्री करणाऱ्यांवर लवकरात लवकर कार्यवाही कारवाही अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी जागर प्रतिष्ठानचे भरत खरात यांच्यासह ग्रामस्थानी दिला आहे निवेदन देते वेळी भरत खरात,नामदेव शेळके,विशाल शिंदे,किरण पांढरे,विनोद गिरी, सविता लांडगे, मीना पाटेकर,सत्यभामा शेळके,कमलबाई दर्गुडे,सखुबाई शेळके,मुक्ताबाई गोरे, कस्तुरबाई गोरे, हवसाबई शिंदे,राधा गोरे,सिंधुबई शिंदे, मर्करणा आणेराव आदी.महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




















