जालना/प्रतिनिधी : दृष्टी ही जीवनाचा अमूल्य ठेवा आहे. त्यामुळे वेळोवेळी नेत्र तपासणी करून घेणे आवश्यक आहे. कारण अनेक दृष्टीसंबंधी आजार सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात आले तर त्यावर योग्यवेळी उपचार करून दृष्टी वाचवता येते. अनेकांना लहान वयातच चष्मा लागतो, तर काहींना डोळ्यांच्या आजारांची लक्षणे उशिरा समजतात. लॉयन्स क्लबच्या माध्यमातून नियमितपणे आयोजित केल्या जाणाऱ्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांमुळे गरजू नागरिकांना त्वरित उपचाराची संधी मिळते, त्यामुळे इतर सेवाभावी संस्थांनीही अशी शिबिरे आयोजित करावीत, आपलेही सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही आ. अर्जुनराव खोतकर यांनी येथे बोलताना दिली.
स्व. गणपतराव पवार यांच्या 35 व्या स्मृतिदिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ जालना, गणेश राऊत मित्र मंडळ, संयोजक रामेश्वर पवार, श्याम पवार व स्व. गणपतराव पा. पवार सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने चंदनझिरा येथील न्यू इंद्रायणी हॉटेलमध्ये शनिवार दि. 22 मार्च रोजी आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन आ. खोतकर यांच्याहस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संतोष सांबरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी नगरसेवक गणेशराव राऊत, माजी नगराध्यक्ष राजेश राऊत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांची उपस्थिती होती. यावेळी लॉयन्सचे जीएसटी कॉर्डिनेटर अतुल लड्डा, झोन चेअरपर्सन राजेश लुनिया, साईनाथ पवार, डॉ. सुनील पवार, डॉ. प्रसाद पवार, सुरेश उपाध्याय, अक्षय पवार, माजी नगरसेवक राधाकिशन दाभाडे, रामेश्वर पवार, श्याम पवार, संतोष रासवे, शांतीलाल राऊत, कैलास पवार, विलास पवार, अशोक जोगदंड, विजय खरात, सिताराम कटारे, कल्याण शेळके, गणेश एखंडे, अजय मिरकड, गजानन ओझा, संतोष डोके, संतोष पवार, रावसाहेब पवार, शिवाजी बजाज, प्रशांत मस्के, सुरज पवार, प्रभाकर पवार, रितेश पंचारिया, सिराज पटेल, दिनेश शेटे, रुपेश जयस्वाल, सुधाकर गायकवाड, हरीप्रसाद मालपाणी, रघुवीर जयस्वाल, रवी भरतिया, प्रवीण शर्मा, शिवराज जाधव, प्रकाश शेळके, रमेश पवार, डॉ. अनिल बोडखे, गजानन कायंदे, रमेश तिवाली, अरुण पेरे, आनंद डहाके, अजय भराटे, शैलेश देशमुख, शुभम राऊत आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी माजी आमदार संतोष सांबरे म्हणाले की, लायन्स क्लबच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे महत्वाचे कार्य केले जात असून, त्या माध्यमातून गरजूंना मोठा दिलासा मिळत आहे. अशा उपक्रमांना आपले सदैव सहकार्य राहील. गणेशराव राऊत म्हणाले की, लॉयन्सप्रमाणेच इतर सेवाभावी संस्थांनी ग्रामीण भागात अशी शिबिरे आयोजित करायला हवीत. त्यामुळे ग्रामीण जनतेला मोठा दिलासा मिळेल.
शिबिरात 123 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली करण्यात आली. त्यापैकी 11 जणांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले असून, त्यांच्यावर चिकलठाणा येथील लॉयन्स नेत्र हॉस्पिटलमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. नेत्रदोष आढळून आलेल्या रुग्णांना मार्गदर्शन करण्यात येऊन पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.