जालना – शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या भारत माता मगासवर्गीय सुधार समिती अंतर्गत असलेल्या अपंग निवासी विद्यालयात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना आता उन्हाळी सुट्या लागणार आहेत. त्यामुळे जालना येथील महात्मा ज्योतीबा फुले समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांना शनिवार दि. 22 मार्च 2025 रोजी दुपारी 12 वाजता अन्नदान करुन सुट्टीसाठी निरोप दिला.
दरम्यान समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अपंग विद्यार्थ्यासोबत गेल्या काही दिवसापासून समाज कार्याचा भाग म्हणून विविध उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांना शिकविणे, संगीत खुर्ची, नृत्य यासह विविध स्पर्धा घेत त्यांच्या आनंदात भर घातली. दरम्यान अपंग विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्या जवळ आल्याने त्यांना आज समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याकडून निरोप देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना अन्नदान करुन त्यांचा आनंद द्वीगुनी करण्यात आला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.




















