जालना शहरातील औद्योगीक वसाहत येथील मत्स्योदरी स्टील कंपनीसमोरुन अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेल्याची घटना दि. 24 मार्च 2025 रोजी रोजी रात्री 8 ते 11 वाजेच्या सुमारास घडली.
औद्योगीक वसाहत येथील मत्स्योदरी स्टील कंपनीत कामानिमित्त गेलेले शिवाजी नामदेव निकाळजे यांनी त्यांची होंडा कंपनीची शाईन दुचाकी क्र. एम. एच. 21 बीएन1239 ही गाडी कंपनीसमोर उभा केली होती. दरम्यान त्यांनी त्यांचे काम रात्री 11 वाजेच्या सुमारास आटोपून बाहेर येऊन पाहिले असता त्यांना त्यांची दुचाकी दिसून आली नाही. दरम्यान त्यांनी आजुबाजूला गाडीचा शोध घेतला परंतु, गाडी कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी चंदनझीरा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दाखल केली आहे. सदरील दुचाकी कुणला आढळून आल्यास त्यांनी चंदनझीरा पोलीसांना संपर्क साधावा असे आवाहन शिवाजी निकाळजे यांनी केले आहे.




















