जालना तालुक्यातील रेवगाव शिवारातील वाकी तलावाशेजारी बेवारसरित्या आढळून आलेल्या वाळु साठ्यावर कारवाई करुन सुमारे 18 ब्रास वाळु जप्त करण्यात आली असल्याची माहिती मंगळवार दि. 25 मार्च 2025 रोजी दुपारी 2 वाजता तहसिलदार छाया पवार यांनी दिलीय.
वाकी शिवारात वाळु साठा असल्याची माहिती तहसिलदार छाया पवार यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी दि. 24 मार्च रोजी सदरील ठिकाणी जावून पाहणी केली. दरम्यान 3 हायवाच्या माध्यमातून रात्री 8 वाजता सर्व वाळुसाठा जप्त करण्यात आला. यावेळी छाया पवार, मंडळ अधिकारी व्ही.एन भोरे, बी.एल. काळे, तलाठी एम. जी. सोनवणे, विशाल अंभोरे, गौरव लाड, नांगरे यांनी छापा मारुन कारवाई केली. दि. 25 मार्च 2025 पर्यंत या वाळुसाठ्याचा मालक पुढे आला नाही. त्यामुळे ही वाळु नेमकी कुणी साठवून ठेवली होती हे स्पष्ट झाले नसल्याने पोलीस ठाण्यात अद्याप काणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही.




















