जालना – येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या परिसरातील एका खदानीत 19 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आल्याची घटना दि. 2 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला असल्याची माहिती गुरुवार दि. 3 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस सुत्रांनी दिलीय.सिमा भगवान पाडळे, रा. योगेश नगर ही युवती मागील दोन दिवसापुर्वी बेपत्ता झाली होती. त्यामुळे तालुका जालना पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रारही दाखल झाली होती. परंतु, अचानक तिचा मृतदेह पोलीस मुख्यालयाच्या परिसरातील खदानीत तरंगतांना दिसून आल्याने तालुका जालना पोलींसानी घटनास्थळी धाव घेतली. खदानीतून मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्युची नोंद करण्यात आलीय.




















