जालना – लग्न लावून लग्नाच्या नावाखाली साडेपाच लाख रुपयाची फसवणूक करुन पळून गेलेल्या तरुणीसह तीच्या नातेवाईकावर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून तीला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनवली असल्याची माहिती गुरुवार दि. 3 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस निरीक्षक सुरेष उनवने यांनी दिलीय.
मंठा येथील पूजा माने हीने तिच्या सरला नावाच्या बहीनीसोबत बदनापूर तालुक्यातील पिर सावंगी येथील रमेश नानासाहेब वेताळ यांच्या सोबत माळाचा गणपती येथे दि. 21 मार्च 2025 रोजी विवाह लावून दिला होता. या विवाहासाठी साडेपाच लाख रुपये दिल्याचा दावा नवरदेवाकडून करण्यात आलाय. हा विवाह करुन ते घरी जात असतांना एका कार चालकाने फिर्यादीच्या कार समोर कार आडवी लावली. सदरील लोक आमचे नातेवाईक आहेत असे सांगून नवरी आणि तीची बहिण त्या कारमध्ये जावून बसले. आणि पळून गेले. त्यामुळे तालुका जालना पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. बनावट लग्न लावून देणार्यामधील एका महिलेला तालुका जालना पोलीसांनी अटक केली असून तीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. असे अजून कुणासोबत बनावट विवाह लावून फसवले आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत.




















