जालना शहरातील अंबड रोडवरील मातोश्री लॉन्स समोर लुटमार करणार्या एका आरोपीसह दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून चोरी केलेला मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असल्याची माहिती गुरुवार दि. 17 एप्रिल 2025 रोजी रात्री 7.30 वाजता पोलीस सुत्रांनी दिलीय.
मिळालेल्या माहितीनुसार दि 15 एप्रिल 2025 रोजी मातोश्री लॉन्स समोरील रोडवर संघर्ष ज्ञानेश म्हसलेकर, रा. चौधरीनगर, जालना यांना 3 जणांनी आडवून त्यांच्या जवळील 500 रुपये रोख आणि कानातील सोन्याची बाळी बळजबरीने हिस्कावुन घेतली होती. त्या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी एक पथक तयार करुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुषंगाने दि. 17 एप्रिल 2025 रोजी पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इंदेवाडी येथील आदित्य सुनिल उघडे यांने त्याच्या इतर दोन साथीदारासह गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले व चोरुन नेलेले 500 रुपये काढून दिले. त्यानंतर दोन विधीसंघर्षग्रस्त बालंकांनाही ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी चोरुन नेलेली सोन्याची बाळी ही नेहरु रोड, सराफा बाजार, जालना येथील विजय गोपीनाथ विसपुते याच्या दुकानामध्ये विजय गोपीनाथ विसपुते, रा. सराफा बाजार, जालना यास विक्री केल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीसांनी विजय गोपीनाथ विसपुते याची चौकशी करुन सोन्याची बाळी घेतल्याचे कबुल केले. पोलीसांनी ती बाळी तपासकामी जप्त करण्यात आलीय.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, अमंलदार रामप्रसाद पव्हरे, प्रभाकर वाघ, गोपाल गोशिक, रमेश राठोड, कैलास खार्डे, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, किशोर पुंगळे, रमेश काळे, सचिन राऊत यांनी केलीय.




















