वर दाढीवाले बाबा, मुख्यमंत्री दाढीवाले आणि मि पाण्यावाला बाबा म्हणून मला पाणीपुरवठा खातं मिळालं असं राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील यांनी म्हटलं आहे.आज गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जालना जिल्ह्यातील नळ पाणीपुरवठा योजनांचा ई -उदघाटन सोहळा पार पडला.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.या सरकारमध्ये सगळ्यांचे खाते बदलले पण माझं खातं कायम ठेवलं असंही ते म्हणाले.राज्यातील कोणतंही उद्धव ठाकरे गटाचं कार्यालय ताब्यात घेणार नाही असंही ते म्हणाले.विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाप बदलले अशी टीका केली.याबाबत प्रश्न विचारला असता गुलाबराव पाटील चांगलेच भडकले हे बघा, पाण्यावर विचारा. विनायक राऊत पाणीवाला नाहीये. असा प्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारला.उध्दव ठाकरे गटाने शिवसेना पक्षाचा निधी कुठे वळवला याबाबत मला कल्पना नाही.त्यांच्या पक्ष निधीवर कोणताही दावा सांगणार नाही असंही त्यांनी सांगितलं.
जालना जिल्ह्यासाठी 694 कोटींची योजनेचा जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांचे ई-भूमिपूजन राज्याचे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे.यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, 694 कोटींची पाणीपुरवठा योजना ही नगर पालिका व जिल्हा परिषद यांच्या मार्फत चालणारी वाटर ग्रीड ही 450 ते 500 गावांना जोडणारी पाणीपुरवठा योजना आहे.या उदघाटन प्रसंगी आमदार बबनराव लोणीकर,आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर,भाऊसाहेब घुगे,आदींची यावेळी उपस्थिती होती.हर घर जल हर घर नल ही केंद्राची संकल्पना आहे.आणि ती आम्ही निश्चितच पूर्ण करणार आहे.या योजनेसाठी लागणार जो निधी आहे तो केंद्र सरकार व राज्य सरकार ही 50 – 50 टक्के देणार आहे.मराठवाडा हा पाण्याच्या बाबतीत दुर्लक्षित भाग आहे.म्हणून आता येत्या दोन वर्षातच मराठवाड्याची पाणी टंचाई दूर करण्याचा निर्धार आता आम्ही घेतलेला आहे.162 कोटींची जी योजना होती त्यासाठी आम्ही फक्त अजन्सी होतो यात नगर पालिका महानगर पालिकाच खर्च करू शकते यात आमचा काहीही हस्तक्षेप नसल्याचे यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितले.हिमायत नगरला जी जलजीवन मिशन योजना राबविन्यताली तीच योजना अर्थसंकल्पना योजना म्हणून राबविण्यात येईल.ही योजना एक हजार कोटींची आहे त्यासाठी लागणारा निधीत 500 कोटी राज्याचे 500 कोटी केंद्राचे यामुळे राज्याचे पैसे वाचतील राज्याचे पैसे वचवावे म्हणून काहीतरी स्वार्थ करावा लागणार आहे.परमार्थावरच स्वार्थ असते वाटरग्रीड योजना ही मराठवाड्यातील गंगापूर,वैजापूर,जालना,सिल्लोड ला ही देण्यात येणार आहे.परतुरसाठी 88 कोटींची योजना ही देण्यात येनार आहे.मराठवाड्याची सालार्धक किंवा सिंगल हि योजना असली तरी मराठवाड्याला पाणी कम पडणार नाही.काम हे संथ गतीने सुरू आहे.याचे कारण काम जास्त झाले आहे.योजना मोठी आहे.हे काम मेहरा या गुत्तेदारास मिळालेली आहे.म्हणून कामहें संथ गतीने सुरू आहे.38 हजार गावांच्या कामाची वर्क ऑर्डर आम्ही दिलेली आहे.त्यावर सह्या सुद्धा झालेली आहे.रात्रंदिवस एक करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करून पाणीवाला बाबा माझी एक ओळख निर्माण करायची असल्याचे यावेळी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.