जालना । प्रतिनिधी – जिल्ह्यातील साम टिव्हीचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसह शेतकर्यांची आर्थिक लुट करणार्या वीमा प्रतिनिधींवरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जिल्ह्याभरातून होत आहे. घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत जिल्ह्यातील पत्रकारांसह शेतकरी संघटनांही आक्रमक झाल्या आहेत. अंबड, भोकरदनसह विविध भागातून पोलीस अधिक्षक, पोलीस निरीक्षक, कृषि अधिकारी यांना निवेदने देण्यात येत आहे.
या संदर्भात देण्यात येणार्या निवेदनात म्हटले आहे की, भोकरदन तालुक्यातील कोलते पिंपळगाव या गावातील शेतकरी यांच्याकडून युनिवर्सल सोमपो जनरल विमा कंपनीचे प्रतिनिधी ऑनलाईन केलेल्या तक्रारीच्या कागदपत्रांची पडताळणी व पिकांची पाहणी करण्यासाठी आलेले असतांना नुकसानग्रस्त शेतकर्यांकडून पैशाची मागणी करीत असल्याची माहिती साम टिव्हीचे लक्ष्मण सोळुंके यांना काही शेतकर्यांनी दिली. त्यावरुन खात्री करण्यासाठी व वृत्तांकनासाठी ते त्या ठिकाणी गेले असता तेथील गावगुुंडांनी वार्तांकन करण्यास मज्जाव करून तु लय पत्रकार झालाय का असे म्हणून शिवीगाळ करून कॉलर धरून धक्काबुक्की केली व तु जास्त माजला आहे, तुला पाहुन घेऊ असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही, आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यासह घटनेचा निषेध करण्यात येत आहे. यासह शेतकर्यांची आर्थिक लुट करणार्या वीमा प्रतिनिधींवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
अंबड तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्यावतीने दिलेल्या निवेदनावेळी राजेंद्र पवार (अध्यक्ष), फकीर मोहम्मद बागवान (उपाध्यक्ष), पवन पवार (सचिव), दिलीपराव पवार, रवींद्र घाडगे, दिलीप दखने, रोहिदास पवार, अनंत मुंडे, सुरेश काळे, कीर्तिनंद गांगुर्डे, प्रवीण काळे, रमेश सूरवसे, चक्रधर नाटकर यांची उपस्थिती होती.
स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष सुरेश पंडीतराव काळे यांच्या नेतृत्तवात अंकुशराव तारख, पांडुरंग गावडे, बाबासाहेब दखले, भारत उंडे आदींनी निवेदन दिले.
हसनाबाद येथे मराठी पत्रकार संघटनेच्यावतीने हसनाबाद पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. यावर देवलाल अकोदे, राजेश गरुड, वसीम शेख, अजिज शेख, निसार कुरेशी, बाळकृष्ण रासने, सलिम काझी, गणेश आकोदे, विलास दुधे, निलेश राठोड, तोफीक कादरी, लखन व्यवहारे, ईश्वर पठाडे, सोनाजी जोगदंडे, पंडीत इंगळे आदींची नावे आहेत.