अंबड: घनसावंगी मतदार संघातील अनाथ, निराधार आणि दिव्यांग बांधवाना शासनच्या कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यसाठी समृद्धी साखर काखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांनी ‘एक हाथ माणुसकीचा … निराधारांना मदतीचा’ ही सामाजिक मोहीम सुरु केली आहे.
या मोहिमेत ग्रामीण भागातील खऱ्या अनाथ, निराधार आणि दिव्यांग व्यक्तींची माहिती घेऊन त्यांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना व दिव्यांग अनुदान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या जनहिताच्या उपक्रमात प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन खऱ्या पात्र लाभार्थींची माहिती अंबड व घनसावंगी येथील जनसेवा कार्यालयाला द्यावी, असे आवाहन सतीश घाटगे यांनी केले आहे.