जालना (प्रतिनिधी) – मंठा तालुक्यातील तळणी येथे नवीन देशी दारूच्या दुकानास परवानगी आणि ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येवू नये अशी मागणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे तळणी, ता. मंठा जि. जालना येथील रहिवाशी महिला नम्रपूर्वक अर्ज सादर करतो की, आम्हाला असे कळाले आहे की, मिराबाई शिवहरी कुटे यांचे देशी दारू चे दुकान पूर्वी पासून चालू आहे. असे असताना मौजे तळणी गावात देशी दारूचे दूसरे दुकान चालू करणे हे योग्य होणार नाही. मौजे तळणी हे खेडेगांव असून सदर गावाची अधिकृत लोकसंख्या ही फक्त 5743 एवढी आहे. यान्वये सध्या गावात चालू असलेले मद्यविक्रीचे परवाने हे गावाच्या लोकसंख्येच्या दृष्टीने पुरेसे आहेत. करिता मौजे तळणी गावात नवीन देशी दारूचे दुकान चालू केल्यास गावातील नागरिक जास्त व्यसनाधीन होवून त्यांचे स्वास्थ बिघडण्याची दाट शक्यता आहे. तसेच नवीन देशी दारूच्या दुकानामुळे गावातील नागरिकांना, महिलांना, शाळकरी मुले व मुली यांना त्रास होण्याची दाट शक्यता आहे.
तसेच निवेदन की, मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर तसेच सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी शैलेश राजेंद्र बडवईक आणि अन्य याचिका क्र, 3440/2011 व एलपीए नं. 314/2012 या प्रकरणा मध्ये स्पष्ट आदेशित व निर्देशित केलेले आहे की, प्रस्तावित मद्यविक्रीच्या परवान्याबाबत नागरिकांच्या / लोकप्रतिनिधीच्या तक्रारी असल्यास कोणत्याही परिस्थितीत मद्यविक्रीच्या परवाना मंजूर करण्यात येवू नये. हे दुकान माऊली मंदीराच्या परिसरात असल्याने कसलाही ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येवू नये. आपल्या अवलोकनाकरिता सदर न्यायालयीन निर्णयाच्या प्रती या सोबत सादर करण्यात येत आहेत. तरी नम्र विनंती की, मा. उच्च न्यायालय आणि मा. सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशाचे व आमच्या तक्रारीचे अवलोकन करून तसेच जनहित नजरेसमोर ठेवून लोकहिताच्या दृष्टीने मौजे तळणी सा. मंठा, जि. जालना गावात कोणताही नवीन देशी दारूचा परवाना अथवा अन्य मद्यविक्रीचे परवाने स्थलांतरीत करण्याबाबत अथवा सुरू करण्याबाबत परवानगी देण्यात येवू नये अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार, काँग्रेस महिला तालुका अध्यक्षा अर्चना राऊत, कांशाबाई शिरगुळे, पार्वती मुदळकर, उषा शिंदे, रंधावनी खाडे, पुष्पा येऊळ, पार्वती राऊत, जिजाबाई शिंदे, राधाबाई झाकणे, मंगल गुंजकर, बैनाबाई शिंदे, बबीता सदावर्ते, मीरा पारडे, सागरबाई पायडे, सवीता ठाकरे व मोठ्या संख्येने काँग्रेस महिलाची उपस्थित होती.