कुंभारी: सोलापूर लोकसभेचे पडघम वाजले असून प्रशासन सज्ज झालेआहे. त्यानुसार निवडणूक आयोगाच्या अधिनस्थ असलेल्या महसूल प्रशासनाने दक्षिण विधानसभेच्या मार्गावर नाकाबंदी बैठे व फिरते पथक यांची नेमणूक केली आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी याव्दारे ये-जा करणाऱ्या वाहनावर लक्ष ठेवले जाणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत होणारे संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये दक्षिण तहसिल प्रशासनाने तालुक्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दक्षिण तालुक्यातील टाकळी, सादेपूर भंडारकवठे अशा 3 ठिकाणी अधिकारी व कर्मचारी तथा पोलीस कर्मचाऱ्यांचे बैठे नाकाबंदी बैठे
पथकाकडून विधानसभा मतदार संघाच्या हद्दीत येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. त्यांच्या दिमतीला ४ फिरते पथक व ४ व्हिडीओ सर्वेअर पथक अशा पथकांची निर्मिती करून निवडणूक काळात गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्याची माहिती तहसिलदार किरण जमदाडे यांनी दिली आहे.