कुंभारी : मुस्लिम धर्मामध्ये रमजान महिन्याला अन्यान्यसाधारण महत्त्व आहे. या कालावधीत पावित्र्य जपले जाते. त्या पावित्र्य आणि त्यागाबरोबरच माणुसकीही जपली पाहिजे असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथील यासीन साब दर्ग्यामध्ये उपसरपंच आरिफ कुरेशी यांनी आयोजित केलेल्या रोजा इफ्तार पार्टी ते बोलत होते. वळसंगला अध्यात्माबरोबरच ऐतिहासिक आणि स्वातंत्र्य चळवळीचा वारसा आहे. हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टींचे गाव, महात्मा गांधींनी दिलेली भेट, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विहिरीचे केलेले लोकार्पण याबरोबरच अनेक हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिक या वळसंगच्या भूमीत झाले. या भूमीचे वैशिष्ट्य त्यागमय असल्याचेही सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी नगरसेवक चेतन नरोटे, माजी जि परीषद सदस्य संजय गायकवाड़, सरपंच जगदीश अंटद, उपसरपंच आरीफ कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य शालम अमलिचुंगे,
समीर कटरे, श्रीशैल भूसणगी, मलकप्पा कोडले, माजी सरपंच श्रीशैल दुधगी, तंटामुक्तीचे अध्यक्ष दाऊद अमलिचुंगे, शफीक पटेल, सोनूताई कलशेट्टी, सादिक कुरेशी, नायब सदर महंमद काशिम कुरेशी, माजी तटामुक्त अध्यक्ष सत्तार कुरेशी, माजी उपसरपंच शफीक कुरेशी, अ.गनी कुरेशी, मुक्तार कुरेशी, रहेमान कुरेशी उपस्थित होते.