जालनाः भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा महायुतीच्या सरकारने केली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पुढाकार घेतला. आज या मंडळाला प्राथमिक स्तरावर 50 कोटी रूपयांची तरतूद असली तरी भविष्यात यासाठी आपण पाचशे कोटी रूपयांची तरतूद करून घेऊन ब्राह्मण समाजातील गरजूंना अधिकाधिक लाभ कसा होईल या दृष्टीने नियोजन करणार असल्याचे प्रतिपादन भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे नूतन अध्यक्ष कॅप्टन आशीष दामले यांनी केले.
ते जालन्यातील ब्राह्मण सभा मंगल कार्यालयात आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विधिज्ञ सी.डी. देशपांडे, सचिन वाढे पाटील यांच्यासह ब्राह्मण सभेचे अध्यक्ष कल्याणराव देशपांडे, उपाध्यक्ष रमेश देहेडकर ,कार्याध्यक्ष डॉ.सुभाष भाले, कोषाध्यक्ष अशोकराव देशमुख यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना दामले म्हणाले की, ब्राह्मण समाजाला संघटित करण्यासाठी आपण आगामी काळात महाराष्ट्राचा दौरा करणार असून समाज एका धाग्यामध्ये बांधून समाजाची शक्ती काय हे दाखवून देऊ तसेच आपल्या समाजाबद्दल हेतुपरस्सर निंदनालस्ती आणि टीकाटिपणी केली जाते ती थांबविण्यासाठी काही ठोस असा कायदा करता येईल काय त्यावरही आपण विचार करत असून परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय उभारण्याचे प्रयत्न राहणार असून पुरोहितांना दरमहा पाच हजार रूपयांचे मानधन सरकारकडून कसे घेता येईल यासाठी देखील प्रयत्न करणार आहोत. जालना हे ब्राह्मण समाजाचे चळवळीचे केंद्र आहे. येथेच ब्राह्मण समाजाचे पहिले अधिवेशन भरले होते. तसेच परशुराम आर्थिक विकास मंडळाची निर्मिती करण्यासाठी दीपक रणनवरे, सुरेश मुळे यांच्यासह समाजातील अन्य मान्यवरांनी जी चळवळ उभी केली होती ती आज यशोशिखरावर पोहचल्याचेही त्यांनी नमूद केले.
याच कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ सी.डी. देशपांडे, कल्याणराव देशपांडे, सुनील जोशी यांनी आपले विचार मांडले. समाजाने एकत्रित येण्याचे आवाहनही या तिघांनी केले. तसेच ही ब्राह्मण सभेची वास्तू उभी करण्यासाठी तब्बल दोन कोटी रूपयांचा खर्च आला असल्याचे सांगून यासाठी समाजातील श्रीमंत तसेच गोरगरिबांनी देखील आपल्या परिने मदत केल्यानेच हे शक्य झाल्याचे कल्याणराव देशपांडे यांनी आवर्जुन सांगितले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आर.आर.जोशी यांनी केले. या सोहळ्यास ब्राह्मण समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
या मान्यवरांचा झाला सत्कार
ब्राह्मण सभा उभारणीसाठी ज्या दानशूर व्यक्तींनी भरीव असे योगदान दिले अशांचा सत्कार आशीष दामले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यामध्ये सी.डी.देशपांडे, भारती विलास नाईक, श्रेया नाईक, डॉ.श्रीपाद देशपांडे, ज्येष्ठ विधिज्ञ बलवंत नाईक, डॉ.प्रकाश सिगेदार तसेच ब्राह्मण यौद्धा दीपक रणनवरे ,सुरेश मुळे, ॲड.श्रीकांत देशपांडे, शुभांगी देशपांडे, ज्येष्ठ विधिज्ञ सुरेश कुलकर्णी, विद्या कुलकर्णी,शिवाजी जोशी, राजकुमार दायमा, श्री फॅब्रीकेटर्सचे संचालक सुनील जोशी, संजय देशपांडे, प्रा.डॉ. ज्योती धर्माधिकारी, बांधकाम व्यावसायिक महेंद्र देशपांडे, पत्रकार दिलीप पोहनेरकर, संजय देशमुख,श्रीकांत शेलगावकर यासह एमबीबीएस मध्ये समाजातील चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यांचाही सत्कार मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन हा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास अमित मगरे,सुरेश मगरे, डॉ.चारुदत्त हवालदार, डॉ.जितेंद्र बारगजे, संजय क्षीरसागर, विनायक महाराज, दिलीप देशपांडे, भगवान पुराणिक, रविन्द्र देशपांडे, डॉ.संजय रुईखेडकर, रसना देहेडकर, विद्या कुळकर्णी, चारुस्मिता हवालदार, शोभाताई देशपांडे, सुचिता पालोदकर, जोस्ना भाले, सुलभा आगटे, सूनिला कांडलीकर, सुखदा देशपांडे, मनीषा कुळकर्णी, रेखा देहेडकर, रश्मी देहेडकर, संपदा कुळकर्णी आदी महिला व ब्रम्हवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.