जालना शहरालगत असलेली शासनाची शेकडो एक्कर जमीन ही आबड परिवाराने स्वतःच्या घशात घालून त्यावर प्लॉटींग केली असून लोकांना विक्री करुन त्यांचीही फसवणूक केली असल्याची लक्षवेधी आमदार अर्जनराव खोतकर यांनी बुधवार दि. 19 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता विधानसभेत मांडली. दरम्यान आबड परिवराने हडप केलेल्या शेतजमीनीच्या अनुषंगाने पुर्ण व्यवहार थांबवून त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीही आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केली. सर्वे क्र. 558,559,560 आणि 53 हे बनावट तयार करुन उच्च न्यायालय आणि इतर विभागाची दिशाभुल करुन सुमारे 100 एक्कर शेजमीन ही हडप केली. त्यानुषंगाने मुळ दस्ताएैवज मागूनही ते उपलब्ध करु शकले नाहीत. असेही खोतकर यांनी सांगीतले.




















